!!...माझा विठ्ठुराया...!!
!!...माझा विठ्ठुराया...!!
1 min
221
चला हो आज विठ्ठुरायाच्या चरणीला।
विठ्ठल निघाले पंढरीच्या यात्रेला।।
यंदा चुकतिया मी येण्या त्यांच्या वारीला।
तरी ऐकू येतोय दारोदारी माझा विठ्ठुराया मला।।१।।
तुझा नाद आम्हा सर्वांना लागला।
मन रडतंय की नाही आम्ही तुझ्या थाटाला।।
आम्ही सर्व अडकलोय आमच्या घराला।
पण तरीही ऐकु येतोय तुझा गजर या मनाला।।२।।
सांभाळ रे देवा या कोरोना संकटाला।
देऊन दे आरोग्य सुदृढ आम्हाला।।
नाही आज आम्ही तुझ्या चरणाला।
तरी मनातून पडतोय मी पाया तुम्हाला।।३।।
