STORYMIRROR

Pradip Kasurde

Others

4  

Pradip Kasurde

Others

माझा राजा

माझा राजा

1 min
340

शिवप्रभूच्या पदस्पर्शाने 

पावन झाली भूमी हो 

रायगडाच्या सिंहासनावर 

बसला माझा स्वामी हो ॥1॥


गुलामगिरीच्या घोर अंधारी

स्वप्न पहिले शिवबाने 

शपत घेवुनि रायरेश्वरी 

स्वराज्य स्थापिले हिंमतीने ॥2॥

 

शेतकऱ्यांचा दिनदुबळ्याचा 

राजा माझा लई नामी 

न्याय निती नियत त्याची 

विचार आहे पुरोगामी ॥3॥


शौर्य पराक्रम मुलखी गाजे 

वैर ना कोणा धर्माचे 

जातीपातीला गाडून त्यानी 

भविष्य लिहिले कर्माचे ॥4॥


साधासुधा गडी मराठा 

रंग त्याचा सावळा 

हाती घेतले स्वराज्य कार्य 

झाला त्याचा मावळा ॥5॥


मोडून पडता प्रेरणा देतो 

शिवबा हा मंत्र माझा 

विश्वात साऱ्या डंका घुमतो 

एकच जाणता राजा ॥6॥



Rate this content
Log in