माझा परिवार
माझा परिवार
1 min
840
माझे आप्त, माझे स्वकीय,
माझे मैत्र, बंधू, भगिनी,
माझा गणगोत लडिवाळ,
माझे पिता, माझी जननी!
माझा परिवार हा जरी,
माझे माझे म्हणू किती,
इथेच नाती संपत नाहीत,
मोठी यादी आजमिती!
परिघ नात्यांचे अजून मोठे,
त्यात आहेत सारे प्राणी,
त्यांचाही दुवा समिप आहे,
नसेल त्यांना मनुष्य वाणी!
ही सृष्टी सांधते जीवितांना,
आपण तिचे स्त्रोत निमित्त
भाव साऱ्यांचा जाणून घेऊ,
'संघच्छत्वम', हे निश्चित!
