माझा पांडुरंग
माझा पांडुरंग
1 min
53
पंढरीची वारी करा
एक वेळा आल्याने
संसारी वाट पाहे
भेटीची ओढ लागल्याने
तळमळतो सखा
माझा पांडुरंग
कीर्तने भजनी
हरिपाठ अभंग
टाळ मृदंग वीण्यांचा
गडगडाट कानी
दिव्य पताका गगनभेदी
साश्रुनयनांनी
अशी ही वारी
पंढरीची करावी
तेने सुखी होय दिनाचा
सोयरा सर्व सांगावी.
