माझा कुणा म्हणू मी
माझा कुणा म्हणू मी
1 min
518
ऋतू सरला मीलनाचा,
एकाकी पर्ण जणू मी,
खुंटल्या आशेच्या वाटा,
माझा कुणा म्हणू मी!
भाग्यवंत ज्यांस सोबत,
अन विरह ही सोसवतो,
आस कोणाची असावी,
ज्यांस दिन ही खंतावतो,
पाश बांधलेच नाहीत,
कोणास हृदय अर्पावे,
पर्जन्ये आसवांची किती,
बरसली कुणा समजावे!
ऋणानुबंधाच्या गाठी
न होत कुणाच्या भेटी
माझा कुणा म्हणू मी
एकलेच पर्ण मी शेवटी!
