माझा गाव
माझा गाव
नाव त्याचे असे भिकवडी
नदीतीरी माझे खेडे गाव
शिक्षकांचीच मांदियाळी
साऱ्या जिल्ह्यातच नाव
शेती सारीच बागायती
नदी कालव्याचे पाणी
किलबिलती ती पाखरे
चिवचिवती मधुर वाणी
सूर्य नभीचा रोज इथे
देतो उबारा नि प्रकाश
रात्री चांदण्यांचा खेळ
अंगणात शुभ्र आकाश
नाथबाबांचे मोठे देवालय
गावात बांधलेय मध्यवर्ती
नादात टाळ चिपळ्यांच्या
होते देवळात काकडारती
लोकही सुखी समाधानाने
कष्ट करतात इथे दिनरात
उस द्राक्षे भाज्या नि धान्य
पिकवी आपल्या शिवारात
मयूर फुलवी सुंदर पिसारा
करी पदझंकार हर दारात
कोकिळेचे ते मधूर कुजन
आम्रवृक्षांवरती ऐकू घरात
सूर्यास्ताच्या कातरवेळेला
जमतेच मैफल ती पारावर
गावच्या विकासाची चर्चा
होते नित्यनियमाने बरोबर
शेतकरी सधन या गावचा
कृपा सर्वांवरती निसर्गाची
कुलदेवतेचा वरदहस्त डोई
जणू वसाहत इथे स्वर्गाची
चार डोंगराच्या मधोमधच
गाव हा निसर्गाच्या कुशीत
वनराजीने सजला नटलेला
राहती लोकंही इथे खुशीत
