माझा गाव
माझा गाव
जन्म झाला पुण्यात
शिक्षण झाले फलटणमधे
शिक्षण बारावी नंतर
विवाह करून आले परत पुण्यामधे...
फलटण गाव तस छान गाव
अस म्हणतात काशी झाली तर
जावे त्याने या फलटण गावासी
अस पूर्वापार म्हणतात हेच खरं....
फलटणमधे देवळे खूप छान
राजाचे गाव हे, नाही काही कमी
शाळा, काॅलेज सारेच इथे मस्त
शिक्षणाची घेतली राजेंनी हो हमी...
मुधोजी राजे नाईक निंबाळकर
फलटणचे होते राजे महान
त्यांच्याच नावची शाळा,काॅलेज
सर्वच होते खूप खूप इथे छान...
इथली माणसं प्रेमळ, सच्चाईने वागणारी
नम्रतेने बोलणारी, एकोप्याने राहणारी
पुरळपोळीचा आस्वाद सदा लुटणारी
शेतात सदा कष्टाचे काम करणारी....
मनसोक्त बांधावरुन जायचे अन्
त्या मुक्त माळरानावर रमायचे
अफाट धावत सुटायचे बिनधास्त
मुलांबरोबर बेधुंद खेळायचे....
