माझा एकलेपणा
माझा एकलेपणा
1 min
316
आज नवा छंद मनी लागला
हा छंद मज बेधुंद करणारा ठरला
कवितेचा छंद मज जडला
ह्या छंदी मज गेले भान हरपून
हा मार्ग माझा एकलेपणाचा झाला
समाजात जमलेल्या गर्दीच्या आवाजात
स्वतःला शोधण्याचा हा माझा प्रयत्न होता
सापडला माझा हा आवडीचा छंद
हा मार्ग माझा एकलेपणाचा झाला
ह्या छंदात शब्दाचा चालतो मेळ खरा
गमक, यमक, भावनांची चालते मस्त जुगलबंदी
माझा हा कवितेचा छंद रमण्यात माझा दिवस जातो
हा मार्ग माझा एकलेपणाचा झाला
