माझा देव माझे सर
माझा देव माझे सर
दुःखानी गुंफलेलं होतं आयुष्य माझं सारं
रडणं इथलं माझ्या देवाच्या कानी गेले
ऐकले गराने परमेश्वराणे माझे
भेट देण्यामजला ते साक्षात मानव रुपी आले
नव्हतं माझं कोणी इथं
दुःख होतं फक्त सोबतीला
ऐकली हाक माझी
देव माणूस ते धावले मदतीला
संभाळले मज त्यानी
आपल्या लेकरावानी
देव माणूस म्हणू की
म्हणू त्यांना बापावाणी
उपकार त्याचे अफाट कसे फेडू मी
प्राण काढून दिला तरी फिटणार नाही
काळजात माझ्या बसलेले रोशन मस्के नाव
शरीराची राख होईपर्यंत मिटणार नाही
माणसातील देव पाहिला मी
काव्यरुपी सांगतो मी या जगाला
असेल नसेल साहित्य क्षेत्रात उद्या मी
देवापाशी मागणे हेच काहीही कमी पडू देऊ नको माझ्या रोशन सरांना.
