माझा छंद
माझा छंद
1 min
192
घेई छंद ,मकरंद प्रिय हा मिलिंद
शब्दाशब्दावर झुलवून ठेवतो तो अक्षरमिलींद
कविता माझी लाडकी,कथाही माझी लाडकी
शब्द तोलून मापून गहन अर्थ सांगते
माझ्या या छंदाला नाविन्याने नटवते
नवनवीन विषयांचे शाबदिक तोरण
सजवते माझे साहित्य सदन
दुःख,राग सर्वकाही विसरवून टाकते
शाब्दिक रसात मला डुंबवून ठेवते
कवितासागरात पोहताना
अलगद चारोळीकडेही मी वळते
कथा-लेखांची भिंत मी उभारते
मंगलाष्टका-भजनांचा वर्षाव मी करते
स्फुरण मज ही कविता देते
असा लेखनाचा छंद मी जोपास ते
भान विसरून मी लिहितच जाते
