माझा भीमराजा
माझा भीमराजा
माता पित्यांच्या पोटी
१४एप्रिल दिनी जन्मला
कोहिनूर हिरा
उच्च शिक्षण घेऊनी
समाजाला दिली त्यांनी
शिक्षणाची कवाडे खोलुनी
सत्याग्रह करुनी
चवदार तळे केले खुले
अवघ्या समाजाची
तृृष्णा भागवली त्याने
चांदण्याची शीतल छाया
होता माझा भीमराया
ममतेची माया भरली होती
ओतप्रोत त्याच्या काया
घरातच रमाईंना दिले
शिक्षणाचे त्यांनी धडे
समाजोध्दारासाठी
रमाईंना जायला सांगितले पुढे
पंडीत होता कायद्याचा
कैवारी होता शिक्षणाचा
असा भीमराया शिल्पकार आमचा
असा होता माझा भीमराजा
असा होता माझा भीमराजा
भारताचे संविधान लिहुन
सुखी केली सारी प्रजा.