माझा भारत
माझा भारत
1 min
372
माझ्या भारतीय संस्कृतीची
सर जगी कोणालाही नाही
शान आहे ती भारताची
तिच्याविना भारताला शोभा नाही
एका देशातच सामावले सारे
नाही भेदभाव कोणताच
नांदतात सुखी गुण्यागोविंदाने
नसे मतभेद कशातच
भिन्न प्रांत ,भिन्न भाषा,भिन्न वेश
तरीही एकच आमचा भारत देश
जातीभेद नसे ठावे कोणा
विविधतेने नटलेला आमचा देश
पाहुणचार पाहुण्यांचा करण्या
सदैव उत्साह असे साऱ्यांचा
माझ्या भारताची संस्कृती शिकवी
विविधतेतही एकच आहोत सारे
ऐक्याची मशाल तेजस्वी ठेवी
सदा भारतभूच्या नावाचे वाहती वारे
