माझा बाप
माझा बाप


आई गं करता करता
पोर झाले महान...
कष्टकरी बाप नाही आठवला त्यांना...
समाजात नाही राहिला मान....
मातीत घातली कुटुंबाची शान....
बापाला देता मागुन शिव्या...
नाही त्याच्या कष्टाची जाणीव....
दिवसरात्र मर मर मरतो...
आपल्या बाजुने सर्व समजाशी लढतो...
असेल दम तर लढा म्हनतो
तिथेच त्याची जिगर कळते...
सर्वांसाठी ते माझे बाबा असतील....
आमच्या सगळ्यांसाठी ते बापमानुस आहेत....
बापाच्या पावलावर पाय ठेवुन मुलाने केली प्रगती...
कधी ना झाली त्याची अधोगती....
बाप होता पाठीशी .....
जणु साक्षात महादेवच
उभा मागे साथीला.....
आयुष्यात एकदा तरी मागे वळुन पहा....
बापाची किंमत कळेल....
तेव्हा दुनिया सलाम ठोकेल.....
बाप हा बाप असतो ....