STORYMIRROR

Piyush Lad

Others

4  

Piyush Lad

Others

माझा बाप शेतकरी...!

माझा बाप शेतकरी...!

1 min
356

घर चालवितो त्याचे अंगघामाच्या नाण्याने 

त्याने भिजवली सारी धरा डोळ्याच्या पाण्याने


त्याच्या रिकाम्या पोटाने पॉट जगाचे भरतो

साऱ्या विश्वाचा पोशिंदा का तो भुकेला मारतो


किती कठीण असतो त्याचा जीवन प्रवास

जीव असून जगाचा असे गली त्याच्या फास


धीर खचू नको देऊ माझ्या शेतकरी राजा

दिस येईल तुझाही देव पाहतोय माझा


(आता मी देवाकडे वळून पुन्हा देवाला प्रश्न विचारतोय की)

रीती झोळी भरतांना छप्पर फाडून देतोस प्रश्न बळीराजा पुसे तेव्हा कुठे हरवतोस?


लोक म्हणतात देवा तू रे माणसात आहेस

मग जगता जगता जीव स्वतःचा का घेतो?


सर्व तुझ्याजवळ असून बाली त्याचा का मागतो?

बळी स्वतःचा देणारा बळीराजा म्हणवतो?


नको सुनं ते आभाळ आता पाऊस तू पाड 

जोड पुन्हा नवे नाते नको कूस ती उजाड


गोड बातमी येऊ दे माझ्या धरणाच्या पोटी

ओंजळ सोनेरी करून धान्याने भर तिची ओटी


आशा खूप नाही देव दोन घास दे गिळाया

फक्त मूठभर धान सुखी जीवन जगाया


आता विनंती एकच,की त्याच्या दारी आनंद फुलू दे

त्याच्या कोरड्या अंगणी पीक सुखाचे डोलू दे..!


Rate this content
Log in