माझा बाप शेतकरी
माझा बाप शेतकरी
1 min
156
माझा बाप शेतकरी
बाप शेतकरी माझा
शेतकरी माझा बाप
अशा आलटून पालटून
क्लृप्त्या अनेक करता
महाराजांच्या आशीर्वादाची
आठवण आपोआप होते
भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे
हे ब्रीदवाक्य मनात रुंजी घालते
कसेही कितीही आलटून पालटून
वाचन केले तरी अर्थ बदलत नाही
प्रत्येक वाक्य उच्चारणाने
शक्ती पाठीशी असल्याचे
जाणवल्यावाचून राहात नाही
सत्य सत्य सत्यच असते
बाप माझा शेतकरी असो की
शेतकरी बाप माझा
अर्थ इतकाच उरात उरतो
शेतकरी बापच खऱ्या अर्थाने
सर्वांचाच बाप असतो..!
