माझा बाप शेतकरी
माझा बाप शेतकरी
1 min
1.6K
बाप माझा शेतकरी
नेहमी खरी पंढरीची वारी
माय माझी त्याला साथ करी
गोर गरीबाचा कैवारी
रात्रंदिवस मेहनत करी
उठतो सूर्योदयाच्या पूर्वी
शेतात राबती बैल जोडि
झुळ झुळ वाहे पाटाचे पाणी
डोलती कणसे वार्यावरती
हिरवे स्वप्न माती वरती
ऐटीत चालतो मर्द गडी
कुटुंबावर वात्सल्य करी
मानाचा फेटा डोक्यावरती
जगणे त्याचे लय भारी
