STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

माझा बा. शेतकरी.

माझा बा. शेतकरी.

1 min
258

शेतकऱ्याचा,मुलगा मी,

शेती माझी आई,

फेट्यावरती तुरा खोवला,

माझा बा शेतकरी.


घाम गाळतो,कष्ट करतो,

फुलवितो शेततळे,आणि शेतमळे,

बांदावरती, सह्याद्रीच्या,गोफण गुंडा,

फिरवितो शेतकरी,

माझा बा शेतकरी, बरे.


सुजलाम, सुफलाम महाराष्ट्रची भू,

शिवार डौलतो, सह्याद्रीच्या कड्यकपारी,

मोत्यांची कणंस त्याला,रास मोत्यांची,

सह्याद्रीच्या पर्वतावर उभा,

छाती पोलादी ,माझा बा शेतकरी बरे.


ऊसमळे,आणि ही महाराष्ट्राची,

साखर बरे,

हा तुरा ऊसाचा डोले,

हा सारा शिवार,हिरवा,

माझा बा शेतकरी,बरे


यशवंतराव, शरदराव,

वसंतराव नाईक,आणि,

लोकनेता गोपीनाथ,मुंडे,बरे,

ही सारी शेतकऱ्यांची मुले,

माझा बा शेतकरी बरे.


महाराष्ट्रच्या कणाकणात,

राजे शिवछत्रपती,

सह्याद्रीच्या किल्ले,आणि हे मावळे,

हा मराठी शिवार,बरे.

माझा बा शेतकरी बरे.


Rate this content
Log in