माझा अमेरिका प्रवास....
माझा अमेरिका प्रवास....
पासपोर्ट काढला,व्हिसा मिळाला
अमेरिकेला जाण्याची तयारी सुरू झाली
अंतरी अनेक विचारांचे काहूर माजले
अप्रतिम निसर्गात रमण्याची चाहूल लागली....
माझ्या जीवनातील पहिला
विमानाचा प्रवास तोही एकटीने
धीर एकटवून मन केले घट्ट
प्रवास झाला सुखकर इतरांच्या संगतीने....,
मूंवई ते पॅरीस पहिला विमान प्रवास
शेजारी होती माझ्या एक फाॅरेनर
सांभाळून घेतले मला तिने
दिसायला फारच हो ती सुंदर...
विमानातील सेवा उत्तम फार
सदैव सेवैत आपल्या ते असतात
लंच, डिनर, पाणी, ज्यूस हवे ते
आपल्याला ते लगेच पुरवतात.....
सर्वच या गोष्टींचे नवल वाटे मज
पाहून ते होई अचंबीत माझे मन
मेघातून जाणार्या विमानाचा प्रवास पाहून
हरपून गेले माझे हो भान.....
कापूस पिंजून ठेवलाय जसे हे मेघ
पांढर्या नि निळ्या मेघांच्या राईत
निसर्गाचे हे रंगरूप भासमान छान
माझ्यासाठी याचे रूप रूतले खोलवर मनात.....
पोहोचले मी आता पॅरीसला
पाय लागले माझे या भूमीला
नशीबवान मी खूप आहे
नमन माझे जिजा-अनुताईला....
पॅरीसला पाच तास होते मी निवांत
एक फ्रेंच आजोबा तिथे भेटले
मारल्या आम्ही गप्पा इंग्रजी अन फ्रेंचमधून
गप्पा मारून त्यांच्याशी फ्रेश वाटले....
पॅरीस तेअमेरिका आता प्रवास सुरू झाला
इथे मात्र सर्वच फॅरेनर विमानात
मी एकटीच इंडियाची पण नंतर भेटले दोघे इंडियाचे
त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून आनंद झाला क्षणात..,,
प्रवास झाला सुखाचा संपूर्ण
पोहोचले मी अमेरिकेला
समोर पाहू न अनुताई, जिजांना
पारावार नाही राहिला आनंदाला....
तिथेच आम्ही दोघींनी घट्ट मिठी मारली
आनंदाश्रूंना वाट रिकामीकरून दिली
हे दृश्य टिपले कॅमेर्यात जिजांनी
हा क्षण पाहून मी हर्षीत झाली....
आपल्या घरी आलो सर्व आम्ही
सीमा, प्रकाश, अनि,अन वैभव होते स्वागताला
हे पाहून सर्व मन माझे आले भरून
भरती आली माझ्या आनंदाला,माझ्या आनंदाला....
