माझा अधिक मास
माझा अधिक मास
1 min
339
आज झाला सुना सुना
भक्ताविना तो गाभारा
मंदिरात वाटे शांत
दान पुण्य नसे वारा...१!
मास अधिक तो श्रेष्ठ
म्हणे यास मल मास
कृष्ण आराधना करू
कृपा व्हावी हीच आस...२!
देती पूरण धोंड्याचे
दान लाडक्या जावई
लक्ष्मी जशी लेकी देई
सोनं,चांदी दान बाई...३!
जाळीदार अनारसे
दाणे बारीक जेवढे
लावू खसखस वर
मिळे पुण्य हो तेवढे...४!
तांबे,पितळी भांड्याचे
गरीबांना द्यावे दान
करा आठवण त्यांची
ऋण समाजाचे भान...५!
भाव भक्तीने करावी
मल मास पूजा सेवा
पुण्य संचय सुखाचा
मिळे जीवनात मेवा...६!
