माही
माही
1 min
226
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून
निवृत्तीची घोषणा केेली
महेंद्रसिंग धोनी तूूझ्या
चाहत्यांची हिरमोड झाली
माही तुझी अदा
लहान-थोरांना आवडायची
म्हणूनच की काय
माही-माही करायची
सर्वोत्तम यष्टीरक्षक तू
डावपेच कोणाला कळत नसे
तू खेेळात नसलास की
उणीव तुझी भासत असे
क्रिकेटच्या विश्वातिल यशस्वी कर्णधार
सन्मानाने उल्लेख केेला जाईल
खेळातील तुझी आक्रमकता
सदैव स्मरणात राहील
मैदानी डावपेच आखण्यात
तू खूप माहीर होतास
प्रतिस्पर्ध्याच्या हातातील सामना
चपळाईने खेचून आणत होतास
