माहेरवाशीण
माहेरवाशीण
1 min
464
टिपूर चांदणे पसरले गगनी,
सडा प्राजक्ताचा मोहवितो मनी.
चांदणे शिंपित आली माहेरवाशीण अंगणी,
सौभाग्याचे लेणे लेवूनि.
दरवळला मंद सुगंध चौफेरी,
प्राजक्तही हसला मनी.
मायलेकी बसल्या माजघरी,
गुज मनीचे सांगू किती,
अबोल झाले शब्द आता,
नयनांची भाषा कळली त्यांना.
रिता झाला घडा आठवणींचा,
बालपणीच्या सख्या सोबतींचा.
गाज सागराची शांत झाली,
अन् लेक मायेच्या कुशीत विसावली.
आठवणींच्या हिंदोळ्यावरी झुलता झुलता,
पहाट झाली लवकरी.
अन् परतीची वेळ येता,
सडा सांडला आसवांचा ,
गहिवरला प्राजक्त अंगणीचा.
परतूनि गेली माहेरवाशीण सासरी,
बरसून गेली सुखांच्या सरी.
