माहेरची वाट...
माहेरची वाट...
🏡सासरचे घर, घरातला थाट...
लाॅकडाउनमुळे विसरावे लागत
आहे हळूहळू आता माहेरची वाट...😌
डोळ्यात लपवलेल्या आसवांना आज फुटला पाझर,
डोकावले जरा बाहेर
नाव आले कानी जेव्हा 'माहेर'..
✨माहेरचा विसावा सतत हवाहवासा वाटतो,
वय किती होवो, माहेर कुठल्याही स्त्रीसाठी एक सुखद कप्पाच असतो, ती असेपर्यंत तो हळवा कप्पा तिची पाठराखण करतच असतो...
आज आठवले, माहेरची ती प्रेमाची छाया,
आई बाबांची माया...
बाबांनी जिथे खांद्यावर खेळवले,
बहिणीसोबत जिथे मायेने राहिले,
आईने पहिला घास भरवला ते बालपण,
भातकुलीचा जिथे खेळ मांडला ते अंगण...☺️
माहेरी जायला मिळावं,
माहेरी जाण्यासाठी हे मन असचं आतुर असावं,
माहेरची आठवण ,
आसवांची साठवण.....
सासरी जाच नसतो, सासुबाई पण प्रेमळचं आहे, सासरे अगदी वडिलांसारखी माया करतात, नवरा तर हक्काचा कायमचा साथ देतो...सगळेच कुटुंब अगदी छानचं... पण....
पण माहेर... आई-वडील...भावंड..आजी..
बहीणी... काही वेगळीच मजा असते नाही का?
आज वाटलं माहेरी जावं,
सकाळी थोडं उशिरा उठावं
बाबांनी हळूच उठली की नाही डोकावून पाहावं..
आईने हळूच चहा ठेवू का ?विचारावं
बहिणीसोबत गप्पा माराव्यात,
जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून यावं,
प्रेमळ मायेचा हात आईने डोक्यावरून फिरवावा,
लहान होऊन बालपण अनुभवावं... चार दिवस का होईना तिथे जावून रहावं.. 😊
आज वाटलं माहेरी जावं...
मनसोक्त हसावं, खेळांव,
मजेत बागडावं..
हसता खेळता मधूनच डोळे भरून पुन्हा
बालपणीच्या त्या जुन्या आठवणींना अजून जगून बघावं...
ऊन-पावसाचा असा हा खेळ असाच रंगत यावा, प्रत्येक क्षण पुन्हा आनंदाने जगावा...
किती छान असतं ना आईकडे ,
दिवसाची सुरुवात कशी होते कळतच नाही,
स्वयंपाक काय करायचा? बाकी काही कामे करायची का? कशाचाच विचार करावा लागत नाही ?
हीच आईची प्रेमळ माया आठवण अगदी मनात असते, हीच आई असते जे न बोलता,न मागता आपल्यासाठी सगळच करीत असते...
बस... और क्या चाहिये?
ती एक ओळ आहे ना,
लेकीच्या माहेरासाठी, आई सासरी नांदते अगदी तसंच..
क्षणभर वाटले,
दूर असूनही सगळे जवळ आहे, डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर माझ्या स्माईल आहे...
माहेरी जाण्याला लागलाच नाट... विसरावी लागेल थोडे दिवस आता माहेरची वाट...
स्वताच्या मनाला समजत म्हटलं,
माहेर-माहेर मी पुण्यवान लेक,
ओढ अशीच राहू दे,
दिवस येतील अनेक,
लावू नको पदर डोळ्याला,
नांद सासरी सुखाने, मनी ठेव माहेरला...
