स्त्री धन
स्त्री धन
1 min
473
ना कोणाची किरकिर
ना कोणती अपेक्षा
लवकर उठलं नाही म्हणून
नसते कुठलीच शिक्षा
वेगळंच असतं माहेरी
प्रत्येक स्त्रीचे स्थान
त्यासाठी परत व्हावंसं
वाटतं लहान
पाहता माहेराहून आणलेली शिदोरी
डोळ्याच्या कडा पाणावतात
त्या गोड आठवणी
का बरं मज सतावतात?
कधीच पूर्ण होत नाही
माहेरी राहण्याची तहान
पण चार दिवस राहून आलं
की आनंदी होऊन जाते मन
