STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

माहेर

माहेर

1 min
61


सुखाची पांघरण

मायेचा ओलावा

असं माझं लाडकं

माहेर गं बाई


हौस, मौज करण्याची

जागा एकमेव तीच

हट्ट सारे माहेरीच

आवडीने पुरवले जाई


जीवाला आराम

नाही कसलं काम

घड्याळाच्या काट्यावर

नाचायचं नाही


भावंडांच्या सोबतीचे

हसरे सारे क्षण

दंगा, मस्ती गमतीने

सजलेले बालपण


रूसायचे, कधी फुगायचे

वडिलांनी मग मनवायचे

चेहरा पाहून मनातले

सारे त्यांना कळायचे


चिंता नाही, काळजी नाही

बिनघोर जगणं असायचं

आईच्या कुशीमध्ये शिरून

गोड स्वप्न पाहत निजायचं


खरचं माहेराची सर

जगात कशालाच नाही

जीव जिथं माझा रमतो

असं हक्काचं माहेरच बाई


Rate this content
Log in