मागे वळून पाहताना
मागे वळून पाहताना
वसुधाची बारावी झाली शिक्षण अर्धवट राहिले
वैभवबरोबर लग्न झाले
शिक्षणाचे अधुरं स्वप्न राहिले
मागे वळून पाहताना सर्व आठवले...
लग्नाचे दीड वर्ष मजेत गेले
एस.पी. काॅलेजला एफ.वाय.एस.वाय केले
जुळ्या मुलींना जन्म दिला
संगोपनातच दिवस जाऊ लागला
मागे वळून पाहताना जीव आनंदला...
डिग्री घेण्याचा प्रयत्न केला
पण तो असफल झाला
सध्या विचार बाजूला सारला
मुलींच्या शिक्षणाला वेळ दिला
मागे वळून पाहताना छंद नंतर जोपासला...
नंतर पोस्टल डी.एड.केले
शैक्षणिक डिग्री घेण्याचे काम केले
डिग्री मिळाली मनासारखी नोकरी पण मिळाली
मागे वळून पाहताना अंतरी वसुधा सुखावली...
अजुनही बी.ए.ची डिग्री हातात नव्हती, हे स्वप्न अधुरं होते
मधल्या काळात मुलाचा जन्म झाला होता
मग वसुधा तिघांचे संगोपन छान करू लागली
मात्र वैभवची तब्येत ढासळू लागली
मागे वळून पाहताना सहनशीलता समजली...
वैभवचे शरीर अनेक आजारांचे माहेरघर
वैभव घरी बसून सांभाळतो आमचे घर
पण वैभव आहे सोशिक फार
सर्व दुखणे सहन करतो अपार
मागे वळून पाहताना आठवले वैभवचे प्रेम अपरंपार...
नाही देत त्रास वसुधाला
नाही जाच तिला
नंतर मात्र वसुधाने मनाचा हिय्या केला
सन २०१० मधे बी.ए. डिग्रीचा मान मिळवला
वसुधानं अधुरं स्वप्न पूर्ण केले
आयुष्यभर माणूसपण जपले
मित्र, सवंगडी, मनापासून जपले
मागे वळून पाहताना डोळ्यासमोर पटकन सर्व आले...
