मागचा बाक
मागचा बाक
1 min
181
शाळेतील मागचा बाक म्हणजे नवनिर्मितीचे ठिकाण,
गप्पा गोष्टी टिंगल टवाळी यांचे तर ते खरे दुकान.
शिक्षकांचे आकर्षण म्हणजे मागचा बाक,
इतरांपेक्षा त्यांच्यावर जास्तच प्रेमाचा धाक.
नडीअडीसाठी नेहमीच बाक मागचा सवडीचा
तरीही ना तुमच्या ना आमच्या आवडीचा.
