STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Others

4  

Sangeeta GodboleJoshi

Others

लतादिदीस ..

लतादिदीस ..

1 min
334

प्रिय लतादिदीस ..

नव्वदाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..


सप्तसुरांवर स्वार होऊनी

 भूवरी आली 'हृदया '

या हृदयीचे त्या हृदयाशी 

नेई हृद्गत 'हृदया'


कृष्णाची जणु हीच बासरी

सूर हिचे घुमतात संगरी 

 सुरसुमनांनी हीच पूजिते 

अनादि अनंत सदया


या हृदयीचे त्या हृदयाशी 

नेई हृद्गत 'हृदया'


'आनंदघना'ची अशी मोहिनी 

सजीवसृष्टी रमे गायनी

सुरासुरांच्या बरसत धारा 

दुःख नेई ती विलया


या हृदयीचे त्या हृदयाशी 

नेई हृद्गत 'हृदया'


भावगीतांची हीच रागिणी 

कमनीय देहीची हीच लावणी

भक्तीरसाची हीच राज्ञी अन् 

सप्तसुरातील आद्या 


या हृदयीचे त्या हृदयाशी 

नेई हृद्गत 'हृदया'


'गानकोकिळा' स्वरसम्राज्ञी

लक्ष मनांची असे स्वामिनी

 बाल्य निरागस असो गोजिरे

 वा आयुष्याची संध्या


या हृदयीचे त्या हृदयाशी 

नेई हृद्गत 'हृदया '



Rate this content
Log in