लपवाछपवी
लपवाछपवी
1 min
119
लाव डीपीवर आता
तुझी छायाचित्रे ताजी
काल समजले मला
पुन्हा झालीस तु आजी
आम्ही लाजतो का बघ
आम्ही मनाने तरूण
केस काळेभोर मस्त
घेतो हप्त्याला करून
वय वाढते मैत्रीणी
त्याला रोखणे अशक्य
ताजे मनाला ठेवणे
हेच तुला मला शक्य
टप्पा प्रत्येक वयाचा
त्याला घालू पायघड्या
झाल्या काळासवे वृद्ध
विश्वसुंदरीही बड्या!
मी ना ययाती गं राणी
चिरतारूण्याचा धनी
मात्र ठासून भरला
जोश कसदार मनी
