लपंडाव
लपंडाव
लपंडाव हा जीवनात सतत येतो
कधी सुख आणि कधी दुःख याची चव दाखवतो
सुख दुःखाचा खेळ असतो सुरू
लपंडाव हा जीवनातला चढ उतार
शिकवीतो!
निसर्गात ही असाच लपंडाव सुरू असतो
कधी पावसाची सर येते तर हळूच कधी ऊन देखील येते!
पावसाच्या आणि उन्हाच्या या लपंडाव मध्ये
निसर्गात मजाही खूप येते!
मुलांच्याही खेळण्यात आणि बागडण्यातच खेळ असतो लपंडाव!
एकमेकांना शोधून काढायचा
खेळ असतो हा लपंडाव!
घड्याळाच्या काट्याची ही गंमत न्यारी
लपंडाव खेळत असतात हे तास, मिनिट, आणि सेकंद काटे!
यांचा हा रोजचा खेळ बघून
आनंद मनाला फार वाटे!
आईच आणि बाळाचाही चालत असतो लपंडाव
बाळ दुडूदुडू धावते फार!
आई त्याच्यामागे पळत असते
मातृत्वाचे सुख मिळते तिला अपार!
जीवनचक्रात ही चालतो नेहमी सतत लपंडाव
कधी मिळते खूप यश तर कधीकधी मिळते खूप अपयश!
लपंडाव हा जीवनातला खेळच खरा
यालाच खेळून मिळते जगण्यात सुयश!
