लॉक डाऊन ने धडा शिकवला
लॉक डाऊन ने धडा शिकवला
प्रदूषणाने माखलेले आपले वातावरण
असंख्य गाडयांच्या धुरामुळे असह्य झाले होते जीवन
कित्येक कारखाने ओकत होते काळा धूर
पक्षी बिचारे त्यातच उडण्यात होते मजबूर
कित्येक नद्या वाहत नेत होती कचरा सांडपाणी
कित्येक लोक बिचारे वापरत होते त्याच नदीचे पाणी
प्रदूषणाचा होत होता किती वाईट परिणाम
उपाय करूनही पण मिळत नव्हता समाधान
अनेक पर्यावरण प्रेमी ओरडत होते
लेख कवितांनी आवाज उठवत होते
पण सगळे गप्प कोणाचे काही ही जात नव्हते
मग आले असे दिवस लॉक डाऊनचे
पाहत पाहता पर्यावरणाचे चित्र पालटले
गुदमरलेल्या पर्यावरणाने दीर्घ श्वास घेतला
अजाणतेपणाने माणसांना लॉक डाऊन ने धडा शिकवला