लोकसंख्या वाढ
लोकसंख्या वाढ
लोकसंख्या वाढ ही समस्या करते आहे उग्र रूप धारण
त्यामुळे सर्व विकास कामांना खीळ बसते आहे
लोकसंख्यावाढ सगळ्या समस्यांचे आहे मूळ कारण
बेरोजगारी, उपासमारी अन् गुन्हेगारी
आपल्या देशात वाढत चालल्या समस्या दिवसापरी
देशाची आर्थिक परिस्थिती ही चालली आहे ढासळत
आता तर दिसते प्रत्येक पदार्थात भेसळ
दरिद्री गरिबी वाढतच आहे काही
मुलं उपोषणाने तर काही कुपोषणाने मरत आहे
जनजागृतीची गरज निर्माण झाली
लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी
शासन स्तरावर सामुहिक प्रयत्न ही काही करण्यात आली
महाराष्ट्र राज्याने त्यासाठी "करू या कुटुंबाचे नियोजन
आनंदी राहू प्रत्येक जण" असे घोषवाक्य ही दिली
पण वाढत चालली लोकसंख्या
काय करावे तिची व्याख्या
अशी परिस्थिती आज ओढावली
म्हणून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी
लावावा थोडा हातभार
सुखी जीवनाचा खरा आधार लहान आणि स्वस्त परिवार
देशाची लोकसंख्या असावी नियंत्रित
गरजा भागतील मग सुरळीत
होईल देशाची प्रगती आणि आर्थिक विकास मग निश्चित
