लोकशाही.
लोकशाही.
आजा मंत्री,बाप मंत्री,
खासदार, आमदार,
कार्यकर्ते भोवती सारे,
मी आहे आमदार.
अशीच आमुची लोकशाही,
आम्ही वारसदार.
आजा शेतकरी,बाप,शेतकरी,
मुलगा मी शेतकरी,
पिढ्यानपिढ्या धंदा,आमुचा,
बुडीत आमुची,शेती,
अशीच अमुची लोकशाही,
ना मिळे काही संधी.
पिढ्यानपिढ्या चाले शेती,
आम्ही लोकशाहीचे वारसदार.
जाहागिरदारी, सरंजामशाही,
बुडीत निघाल्या,वतनाची,पाटीलकी,
आजा होता मंत्री,बाप होता, सभापती,
आता बघा मी खासदार,
अशीच आमची लोकशाही,
आम्ही वारसदार.
गरीब माणुस गरीब आहे ,
नसे त्यास संधी काही,
नसे रोजगार,नसे पैसा,
पारावरती रम्मी खेळतो,
पिण्यास त्याला दारु लागते,
सारे दारे बंद त्याचे,
हा लोकशाहीचा, शिलेदार,
अशीच अमुची लोकशाही,
आम्ही वारसदार.
बांदावरती,भाकर खात,होता,
आमुचा आजा पंजा,
तिचं शेती तेच घर,
आम्ही चार भाऊ वारसदार,
लोकशाहीचा झेंडा फडकवतो,
चार पिढ्या गेल्या आमुच्या,
नसे कोणी आमदार,खासदार,
ज्यांचा आजा होता मंत्री,
नातू त्याचाच आहे पुढारी,
अशीच अमुची लोकशाही,
आम्ही वारसदार.
लोकशाहीचा झेंडा खांद्यावर,
तेच तेच वारसदार,
मत द्या,मत द्या,बाप लेंकाना,
दोन्ही होतील आमदार,
अशीच अमुची लोकशाही,
चार पिढ्या मतदार.
