STORYMIRROR

Shrikant Dixit

Others

4  

Shrikant Dixit

Others

लोकगीत -गवळण

लोकगीत -गवळण

1 min
504

अगं अगं मावशी बाई

भरभर ये माघारी... अडलाय वाटेवरी 

नटखट कृष्ण मुरारी 

सोंगाड्या. .सोंगाड्या बाई. ..छळतोय मजला हरी...

हरी रे...छळतोय मजला हरी..हरी रे छळतोय मजला हरी॥धृ॥


खोड्या काढतो गं

काढतोय जाताना...

वाट वाकडी गं

आडवतोय कान्हा

आला हा वाटेवरी...वाजवीत बासरी

ह्याची ही दादागीरी

करतोय..नटखट कृष्ण मुरारी 

सोंगाड्या सोंगाड्या बाई. .छळतोय मजला हरी 

हरी रे छळतोय मजला हरी. .हरी रे छळतोय मजला हरी ॥१॥


दगड फेकूनी गं

फोडतो मटके माझे

डोईवर माझ्या गं

आधीच आहे ओझे

हाती आहे रे लगोरी...सवंगडी हे शेजारी

ह्याची भलतीच रूबाबदारी

करतोय..नटखट कृष्ण मुरारी 

सोंगाड्या सोंगाड्या बाई. .छळतोय मजला हरी 

हरी रे छळतोय मजला हरी. .हरी रे छळतोय मजला हरी ॥२॥


माग माग हा

पाठलाग करतो

लोण्याचा मटका

हातात घेतो

हा तर लयच शिरजोरी

करतोय..नटखट कृष्ण मुरारी 

सोंगाड्या सोंगाड्या बाई. .छळतोय मजला हरी 

हरी रे छळतोय मजला हरी. .हरी रे छळतोय मजला हरी ॥३॥


Rate this content
Log in