STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

2  

अमोल धों सुर्यवंशी

Others

लोक आहेत ना.......!

लोक आहेत ना.......!

1 min
464

तू तुझे चांगले पण शोध

वाईटावर लोक आहेत ना.

चालायचंच असेल तर रस्ता निवड.

मागे खेचाया लोक आहेत ना.


स्वप्न बघ पर्वता एवढ

अशक्य गोष्टीसाठी लोक आहेत ना.

अंतरमनात ज्वाला भडकु दे विजयाची

 विझवायला लोक आहेत ना


जपायच्या असतीलच तर आठवणी जप

नात विसरणारी लोक आहेत ना                         

प्रेम तर स्वतःवर कर

खोटं दाखवाय लोक आहेत ना


अडाणी बनुन रहा या दुनियेत

समजदार बनवाया लोक आहेत ना

अनोखा क्षितिजाला गवसणी घाल

रस्त्यावर चालाया लोक आहेत ना


आयुष्य असा एक मंच गाजव तु.

टाळ्या वाजवायला लोक आहेत ना....


Rate this content
Log in