STORYMIRROR

Sonam Thakur

Others

3  

Sonam Thakur

Others

लंडनवारी

लंडनवारी

1 min
39

सहलीचा विषय ऐकून

भूतकाळात मी हरवले

गोड जुन्या आठवणीत 

पुन्हा मी पुरते रमले


सहलीला जाणार म्हणून 

होते मी आनंदात

कारण बसणार होते मी

प्रथमच विमानात


लंडनच्या काका काकूंनी

बोलवले होते फिरायला

महिनाभर आधी सांगून झाले होते 

माझ्या कॉलेच्या मित्रांना


प्रथमच विमानात बसण्याची

होती मोठी गम्मत

खिकडकीपाशी बसून

बाहेरचा अथांग आकाश 

होते मी न्याहाळत


लंडन ला उतरून

काकांकडे जाताना

पाहत सारे कुतूहलाने

निसर्ग पाहून मन भरले आनंदाने


लंडन eye मध्ये बसून 

घेतला साऱ्या परिसराचा आनंद

फेरी boat मधे बसून फिरले 

Thames river स्वच्छदं


Buckingham palace ला दिली भेट

तिथूनच गेले Madam Tussauds थेट

थोरा मोठ्यांचे मेणाचे पुतळे पाहून 

गेले मी खरच भारावून

त्यांच्या सोबत मनसोक्त फोटो घेतले काढून


आम्हा मुलांचे Southend पार्क

होते आवडते ठिकाण

तिथल्या अदभुत rides पाहून

हरवले देहभान


तिथून आमची स्वारी निघाली

Cricket च्या पंढरी

Wembley आणि Lords स्टेडियम

होते खूपच भारी


Scotland च्या वाटेवर

घेतला तेथील खाण्याचा स्वाद

पिझ्झा बर्गर Doughnuts चा

घेतला चांगलाच आस्वाद


Scotland ची सफर 

सुद्धा होती भारी

तेथील निसर्गसौंदर्याची 

दुनियाच न्यारी


तेथील राजवाडे आणि किल्ले

आहेत खूपच मस्त

तेथील साऱ्या प्रेक्षणीय स्थळांचा

आनंद घेतला मनोसक्त


तुमच्यामुळे आठवली मला

माझी अविस्मरणीय सफर

आजही डोळे बंद करतास

राहते सारे चित्र पुन्हा

डोळ्यासमोर हजर


Rate this content
Log in