ललीत लेख ..कोरोना अनुभव
ललीत लेख ..कोरोना अनुभव
कोरोनाने शिकवला धडा काय वर्णू आता....
न विसरणारी ही आठवण
कसे झाले? काय झाले? सांगू आता काय?
आली मला आठवण त्या दिवसाची नको हा अनुभव ग बाय...
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वजण घरातच बसले
शासनाने सारेच लाॅकडाऊन केले
घरातले पीठ,तिखट,खाऊ सारे संपतच की हो आले
काय करावे समजेना
विचार करून काही उमजेना....
कोरोनाने दिलाय मला छान धडा
विचार करून करून डोके लागले दुखायला
संपत आला घरातला भाजीपाला
दुकाने सारी बंद, लाॅकडाऊन केले
खाद्यपदार्थ सारे संपुष्टातच आले
काय करावे समजेना
विचार करून काही उमजेना...,
तेवढ्यात एक पोस्ट आली
व्हाॅटसॅपवर मो.नं,ची यादी आली
घरपोच किराणा,भाजीपाला मिळेल
मी आनंदाने हुरळून गेले
एक नं. शहाणपणाने सेव्ह पण केला
एवढ्यावर न थांबता मेसेज केला...
'मला व्हाॅटसॅवर आपल्या नावांची यादी मिळाली
आपण किराणा, भाजीपाला घरपोच देता म्हणे? 'एवढेच बोलून शांत राहिली
काय करावे सुचेना
मन मात्र कशातच लागेना....
चिडला की हो तो इसम खूप खूप
मेसेज मधूनच राग व्यक्त केला
नं. कोणी दिला? तुम्ही असा मेसेजच का केला?
बाई बाई किती मी घाबरले याच्या मेसेजला
मला बोलला 'तुमची कम्लेंटच करतो मला काय समजला? मी कोण माहित आहे का तुम्हांला?'
मग मी घाबरतच मला आलेली पोस्ट पाठवली
त्यांना sorry sorry म्हणून गोष्ट संपवली
माझे काय चुकले हो सांगाल का बरे!
ज्यांनी हा मेसेज पाठवला नावांचा त्यांना तरी काय माहित
असे काही हे खोटे निघेल खरे
काय माहित असे काही होईल?
पुढे हा धडा आपल्याला मिळेल.....
(एक जीवनातील महत्त्वाचा धडा मिळाला हे नक्की..,)