STORYMIRROR

Sanjay Gurav

Others

3  

Sanjay Gurav

Others

लळा..

लळा..

1 min
11.6K

लळा जीवाला लावता

न लगे आणिक काही 

दुःख दुजाचे पाहता

प्रेम पाझरे लवलाही.


लळा जिव्हाळा शब्द

नव्हेत खोटे घ्या जाणून

ओल मायेची एकमेकांना

द्यावी आपलेच मानून.


कामापुरता मामा नसावा

भाव सत्य अंतरी वसावा.

जीव लावावा जीवापाड

स्पर्श आपुलकीचा असावा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन