लळा मातीचा
लळा मातीचा
1 min
168
जन्मले या भारतात
राहते बाई पुण्यात
लळा मातीचा लागला
आनंद आहे जगण्यात.....
जन्मभूमी ही माझी
कर्म दिले विधात्याने
आईबाबा माझे मायाळू
प्रेम केले अमाप पतीने....
संस्कारीत ही मायभूमी
संस्कार लावते जीवनाचे
जगणे कसे असावे जीवनी
कौशल्य आपल्या हाताचे.....
बंद किवाडे या ज्ञानाची
सारी उघडी करूयात
ज्ञानाचे बीज ह्रदयी पेरूया
आलेली फळे सर्वांना वाटूया...
