लक्ष्मणरेषा नियमांची
लक्ष्मणरेषा नियमांची
1 min
372
पाऊल नेहमी पुढे टाकतो
आज जरा मागे टाकू या
मुकाबला कोरोनाशी कराया
घरातच आपण सारे थांबूया
नका ओलांडू लक्ष्मणरेषा
सरकारी नियमांची
घराबाहेरी आहे मृत्यू
पडेल सावली त्याची
जीव एकटा नाही आपला
कुटुंबाचा आपण आधार
संयम राखला नाही तर
कुटुंब होईल निराधार
डॉक्टर, पोलीस बांधव सारे
जिवावर उदार होऊन झटती
आपल्याला विनंती केवळ एकच
घरात बसण्याची करती
करू प्रार्थना घरी बसुनी
विश्वाच्या कल्याणासाठी
सारे मिळुनी संकल्प करु या
कोरोनाच्या उच्चाटनासाठी
