लज्जतदार
लज्जतदार
1 min
12K
हाताशी घेऊन यांना,
घालते रेसिपीजचा घाट,
हे सगळे आहेत म्हणून,
जेवणाचा वाढतो थाट.
लॉकडाउन च्या काळात सगळे घरी,
खाऊसाठी करती वेगळ्या मागण्या सारी,
हळद, तिखट, मीठ आणि जिरे, मोहरी,
स्वयंपाक घरात असते यांची मक्तेदारी.
जिरे मोहरीची बसली फोडणी,
हळदीने आणला छानसा रंग,
मीठाने आणली चवही भारी,
तिखट खाऊन होती सारे दंग.
राखायला आपल्या जेवणाची इज्जत,
घालावी लागेल या वस्तूंशी हुज्जत,
हळद, तिखट,मीठ,मोहरी,इत्यादी,
वाढवतात आपल्या पदार्थांची लज्जत.
