लिंबू सरबत
लिंबू सरबत

1 min

3
*लिंबू सरबत*
कोकणातून मामा, मामी आले
थंड थंड पाणी त्यांच्यापुढे केले..
काय देऊ थोड्यावेळाने विचारले
मामीने लिंबू सरबत करायला सांगितले ...
एका पातेल्यात थंड पाणी घेतले
साखर घातली, मस्त लिंबू पिळले ....
वापर केला चवीप्रमाणे सैंधव मिठाचा
लिंबू सरबत झाला अतिशय चवीचा...
मस्त लिंबू सरबत ग्लास मध्ये ओतले
मामा अन मामीला प्यायला दिले....
मामा मामी साठी सरबत छान बनवले
त्यांनाही ते खूप खूप आवडले...
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा - पुणे*