लीला परमेश्वराची
लीला परमेश्वराची
1 min
538
वाटे कुतूहल
कशा उमलती कलिका?
बहरती लतिका
स्वच्छंदे
येती कोठून?
पुष्पांमध्ये रंग नाना
पाखरांच्या ताना
सुस्वर
स्थिरावले कसे
खगोल सारे आकाशी?
मकरंद सुमनांशी
कैसा? ठेवितो सुखे
तोचि एक भगवंत
अनादि, अनंत
अनाकलनीय
निराकार परमेश्वर
तयाची अगाध लीला
मानते आभार शीला
