लिहायचं
लिहायचं
कधी प्रश्न पडतो, की आज काय लिहायचं.
मनाच्या कोपऱ्याला मग, अलगद काही सूचायचं.
काही ना काही तरी, बुद्धी सोबत जाऊन मिळायचं.
पांढऱ्या पानावर, अवचित अस ते ऊतरायचं.
शब्दांचे मोती ओंजळीत उचलताना, काही तरी सांडायचं.
हसऱ्या डोळ्यांनी मग मी, त्यच्या कडे पाहायचं.
त्याच मोत्यानां घेऊन, मग काव्याचा गजरा विणायचं.
साहीत्याच्या सुंदरतेवर, नंतर ते माळायचं.
कधी चांगल कधी वाईट, काय ते बनवायचं.
कधी जाणवायचं तर कधी, वेळ गेलेला नाय कळायचं.
हेच व्हायचं सारखं, सगळं काही बरोबर चालायचं.
पण प्रश्न तोच पडायचा, की आता काय लिहायचं.
