Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Others

2  

Vijay Sanap

Others

लहानसं खेडं

लहानसं खेडं

1 min
1.4K


गाव माझं एक लहानसं खेडं

गावाचं शिवार असे लय थोडं

गावाच्या लगट डोंगर फारं

लांबूनच दिसे हिरवे हिरवे गार ---- !!

 गावाचं नाव माझ्या जनुनावाडी

 गावाच्या बाजुस शेत शिवारवाडी

 खालती गावाच्या आमराई दाट

 त्यातूनच असे बाजाराची वाट ----- !!

 गावाच्या पल्याड नदी चुनखडी

 शोभा कशी देते उंचती टेकडी

 डोंगराची काळी मैना दिसे काळी भोरं

 खाण्यासाठी जीव माझा करे हूर हूर ---- !!

गाव माझं कसं लय लय छान

मंदिराचा कळस दिसे उंचावून

झाडे देई शोभा वडपिंपळाचे दाट

पाखरांचा चाले तिथे किलकिलाट ---- !!

 बैलगाडीचा मला भारी नाद

 राखितो हाकीतो घालतो मी साद

 बैलाच्या गळा वाजे घुंगरमाळा

 त्यांच्यासाठी सण मला आवडतो पोळा ---- !!


Rate this content
Log in