STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

4  

Samiksha Jamkhedkar

Others

लहानपण देगा देवा

लहानपण देगा देवा

1 min
288

लहानपण म्हणजे 

फुलपाखरासारखे स्वछंद बागडने

हसणे, खेळणे, पळणे, रडणे

नव्हता कशाचा हेवा दावा।

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा।


लहानपण म्हणजे

खो खो संगीत खुर्ची चमचा लिंबू

सागरगोटे, ठिकरी पाणी लपाछपी

नव्हती कसली खंत अन चिंता।

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा।


एक रुपयांच्या गोळ्या, दोन रुपयांची बिस्किट,

एक रुपयांचे पोंगे,एक रुपयांची संत्री गोळ्या

पाच रुपयात यायचा खाऊ सारा।

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा।


मामाच पत्र हरवलंय कुठेतरी

खेळत नाही कुणीच आता

लहानपण गेलं मोठेपण आलं

वाढल्या जबाबदाऱ्या नात्यांचा गुंता।

म्हणून म्हणते लहानपण देगा देवा

मुंगी साखरेचा रवा।


Rate this content
Log in