लहान असतो तर...
लहान असतो तर...
1 min
105
बालपणात सारं काही
कसं आलबेल होतं
फक्त मस्ती मज्जा भारी
कसलंच तेव्हा टेन्शन नव्हतं
एकच टेन्शन होतं ते
रोज खूप सतवायचं
ओरडा मिळणाऱ्या
फक्त त्या अभ्यासाचं
बाकी मस्त मजेत असायचं
खाऊन पिऊन एकदम तृप्त
धिंगाणा हट्ट करून
फिरणं हींडणं खेळणं होतं
खेळ,खोड्या काढण्यात
आखा दिवस जायचा
गरीब कोण,कोण श्रीमंत
हा भेदभाव च नसायचा
आपल्या दुनियेतील
आपण राजा असतो
आचार विचार मनात
तेव्हा बुद्धीलाच नसतो
कसली खळबळ
मनात ती नव्हती
आवड ती एकच
फक्त खेळायची होती
पुन्हा लहान असतो झालो
दगदग धावपळ ती नसती
खुशाल स्वच्छंदी जगून
टेन्शनला गोळी मारली असती...
