लग्नाच्या आधी सोयरीक जुळवायचं
लग्नाच्या आधी सोयरीक जुळवायचं
लग्नाच्या आधी सोयरीक जुळवायचं
मुलामुलींच्या मनात काय
हे कुणी ओळखायचं.....!
घरचे असतात कधी होऊन जाईल
एकदाचं
इकडं तो पर्यंत भेटी घेऊन
सूत जुळवून मोकळं व्हायचं....!
काहीबाही बहाणा करायचा
तुझं माझ्यावर प्रेम आहे असं बोलून
सगळा प्लॅन रचायचा
घरच्यांच्या कुठं लक्षात येतंय सावळा गोंधळ
कुठं नाही सांगायचा.....!
घरी सांगून टाकायचं माझा होकार
लग्नाच्या पत्रिका वाटून बेजार
सार गावाला लग्ना दिवशी तू ये
अजुन मुलगी का येईना प्रियकरासोबत
झाली फरार...
आता कुणाला बोलायचं
आपलेच दात आपलेच ओठ
शेवटी दुसऱ्याला हसायचं
आपल्याच पायावर धोंडा
पाडून घ्यायचा.......!
लग्नाच्या आधी सोयरीक जुळवायचं
मुलामुलींच्या मनात काय
हे कुणी ओळखायचं.....!
