लग्नाचा अट्टहास
लग्नाचा अट्टहास
1 min
230
असेलही चांगला लग्नाचा अट्टहास
तिथे नको जबरदस्ती नाहीतर
लागेल मनस्तापाचा फास...
जुळायला हवी ती मनं
नको नुसती बघा-बघी
नाही आवडले एकमेकांना
समजुन घ्यावे ही वृत्ती असावी जना...
लग्न पद्धती असतेच मुळी
दोन कुटुंब जोडणारी
हे समजून घ्यावे जनांनी
म्हणजे तंटे होणार नाही कुळी...
"ती"ची, "त्या”ची शेवटी पसंद महत्त्वाची
नको तेथे मनाविरुद्ध जबरदस्ती...
लग्नाचा अट्टहास शेवटी
कोणासाठीही चांगलाच
जीव जडला एकमेकांवरी
तर समजावं संसाराचा डावही रंगलाच...
