STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

लग्न सोहळा ( सहाक्षरी )

लग्न सोहळा ( सहाक्षरी )

1 min
658

पूर्णत्व स्त्रीत्वास

हा लग्न सोहळा

जणू भावनांचा

भरलेला मेळा


शृंगार सारेच

तुझ्याच रे साठी

बांधल्या अशा या

जन्माच्याच गाठी


कुंकवाचे वाण

माथी तू भरले

क्षणात सर्वस्वी

मी तुझी जाहले


स्वप्न नवतम

संसारी पाहते

साथ दयावी तू ही

आशा बाळगते


साहित्याला गुण द्या
लॉग इन