STORYMIRROR

प्रतिक्षा कदम

Others

4  

प्रतिक्षा कदम

Others

लेखण्या परक्याच हाती..

लेखण्या परक्याच हाती..

1 min
322

आजही कधी मन बावरते एका मुक्या क्षणाला।

अनामिक शीळ जागवू पाहे निद्रिस्त मन्मनाला ।।


अंतरी माझिया वसती आसवे अन हुंदके ।

यातना मनी परि आनंदी मी भासवे हे मुंडके ।।


जीवन माझे नाट्य एक नि मी तयातील नायिका।

एकपात्री अभिनय खरा, बाकी केवळ भूमिका ।।


कोण म्हणते मी कधी रंगामध्ये ना दंगले ।

दुःखाच्या प्रत्येक छटेने अंतरंगी रंगले ।।


वाटलेले मम जीवनाची मीच असावे लेखिका ।

लेखण्या परक्याच हाती रेखिली शोकांतिका ।।


नको घालूस शीळ खोटी, दुःखातच मी आहे सुखी ।

सल मनातील अंतरीच तरी हास्य झळकेल मन्मुखी ।।


Rate this content
Log in